बुलडाणा:माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ 14 ऑक्टोंबर रोजी कोलवड येथून करण्यात आला. जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शनमुख राजन यांनी कुटुंबाची तपासणी करून प्रत्यक्षरित्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. अभियानाच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर हा टप्पा सुध्दा आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ता यांनी यशस्वी करावा.
कोरोना विषाणू विरूध्द लढण्यास ही मोहीम निश्चितच निर्णायक ठरत आहे. या मोहिमेदरम्यान घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे. आपली तपासणी करून घ्यावी. कुणीही तपासणीचे सुटता कामा नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ वनिता रिंढे, लसीकरण सह नियंत्रक दीपक महाले, ग्राम विकास अधिकारी श्री. बिबे, आरोग्य सहाय्यक एम. पी. चव्हाण, आर. डी. राऊत, आरोग्य सेविका सुनीता जवंजाल, पूजा जाधव, तसेच गावातील आशा कार्यकर्ता उपस्थित होते.