प्रा. मयुरी पाटील |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 20 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. काही तांत्रिक अडचणी मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सदर परीक्षा 20 ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. 20 ऑक्टोबर पासून च्या सर्व परीक्षा यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी जाहीर वेळापत्रकानुसार होतील. 12 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ हेमंत देशमुख यांनी दिली.