नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव आमंत्रित

0
417

अकोला: अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्यामार्फत स्‍वयंसहायता गटांकडून नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव दि. 15 ते 30 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. नविन शिधावाटप दुकाने परवाना अर्जाचे नमूने प्रत्येकी शंभर रुपये भरुन प्राप्त होतील.

स्‍वयंसहायता गटांची निवड करतांना स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य राहील. महीला स्‍वयंसहायता गट उपलब्‍ध न झाल्‍यास पुरूष स्‍वयंसहायता गटाचा विचार करण्‍यात येईल. अर्जासोबत पुढील  कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. विहीत नमुन्‍यातील अर्ज (अध्‍यक्ष व सचिव सुस्‍पष्‍ट फोटोसह)अध्‍यक्ष व सचिव यांचा एकत्रित फोटो, स्‍वयंसहायता गटाचे नोंदणी प्रमाणपत्रस्‍वयंसहायता गटाचे आर्थिक स्थितीबाबत साक्षांकित कागदपत्रेउदा. पासबुक व बँकेचे प्रमाणपत्रव्‍यवसाय करावयाच्‍या जागेचे मालकीबाबत कागदपत्रेजागा भाडयाची असल्‍यास भाडेपत्रघरटॅक्‍स पावती, जागेचा 7/12, जागेचे क्षेत्रफळव्‍यवसाय ठिकाणचे क्षेत्र (चौ.फुट), बँकेकडून घेतलेल्‍या कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेकडून प्राप्‍त झालेले), आंकेक्षन अहवाल मागील तीन वर्षाचास्‍वयंसहायता गटातील अध्‍यक्षउपाध्‍यक्षसचिव व सर्व सभासदांची नांवे पत्‍यांसहगटाचे मुळ व आजचे भाग भांडवल व सध्‍या करीत असलेला व्‍यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती, रास्‍तभाव  किरकोळ केरोसीन परवाना मिळण्‍याबाबत व व्‍यवसाय करण्‍यात संमती दर्शविलेला गटाचा ठरावरास्‍तभाव व केरोसीन परवाना स्‍वयंसहायता गट स्‍वत:एकत्रितरीत्‍या चालवित आणि कोणत्‍याही इतर व्‍यक्तिसंस्‍थेला चालविण्‍यास देणार नाही. याबाबत सर्व सदस्‍यांचे एकत्रीत प्रतिज्ञापत्र (तहसिलदार यांचेकडून साक्षांकित केलेले) मुळ प्रतअर्ज त्‍याच भागातील स्‍वयंसहायता गटांनी करावयाचे आहेत, सदर जाहीरनामा काढण्‍यापूर्वी स्‍वयंसहायता गटांनी परवाना मिळण्‍याकरीता सादर करण्‍यात आलेल्‍या अर्जाचा विचार केल्‍या जाणार नाही . त्‍यांना सदर जाहीरनाम्‍याचे अनुषंगाने नव्‍याने अर्ज सादर करावा लागेल, असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी तथा परवाना प्राधिकारी श्री .बी.यु. काळे यांनी कळविले आहे.

Previous articleअकोला ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा; जीव मुठीत घेवून करावा लागतोय प्रवास
Next articleप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी पापळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here