मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोविड रुग्ण सेवेसाठी डॉक्टरांची माघार दिसून आल्याने जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या २८ डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. वैद्यकीय सेवा नाकारल्यास साथरोग कायद्यान्वये संबधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल व त्यांची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ४ डेडीकेटेड रुग्णालय व २५ कोविड केअर सेंटरमध्ये ५३८ पदभरतीसाठी आॅर्डर दिल्यानंतरही एकुण पदांपैकी १४४ तर प्रत्यक्षात २७३ पदे रिक्त आहेत.
कोरोनाची सध्याची व संभाव्य स्थिती लक्षात घेवून जिल्ह्यात तब्बल २५ कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत तसेच ४ डेडीकेटेड कोवीड रुग्णालय सज्ज आहेत. तत्पर रुग्णसेवेसाठी डॉक्टर व इतर कर्मचाठयांच्या एवूष्ठण ६८२ पदांना मंजुरी देण्यात आली. ५३८ पदभरतीसाठी आॅर्डर दिल्यानंतर ४०९ जणांनी पदभार घेतला तर एवूष्ठण पदांपैकी १४४ तर प्रत्यक्षात २७३ पदे रिक्त होते. विशेष म्हणजे एमडी मेडीसीन फिजीशीयनची १० पदे तर अॅनेस्थेटीस्टची १० पदांची आवश्यकता असून एकही इच्छूक डॉक्टर आपली सेवा देण्यासाठी समोर आलेला नव्हता. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपाययोजना करतांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील २८ खाजगी डॉक्टरांची सेवा आॅक्टोबर महिन्यासाठी अधिग्रहीत केली आहे. सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या डॉक्टरांना दिनांक व वार नेमून देण्यात आला आहे. कोविड १९ या आजाराकरीता सेवा अधिग्रहीत केलेल्या डॉक्टरांनी सेवा उपलब्ध करून न दिल्यास त्यांचे विरूद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची नोंदणी रद्द करण्याकरीता इंडियन मेडीकल कॉन्सील व आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस राममूर्ती यांनी दिला आहे.