चिखली: महाआघाडी सरकारने अद्यापही मंदिर उघडण्याची परवानगी दिली नाही, राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील उद्या, 13 ऑक्टोबर रोजी चिखलीत लाक्षणिक उपोषण करणार आहेत. चिखली मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांना त्या भेटी देणार आहेत.
भक्तीमध्ये तल्लीन झालेले, वारकरी, महानुभाव असे विविध महाराष्ट्रात संप्रदाय आहेत . महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ,संत नामदेव, संत चोखामेळा, संत सेनाजी महाराज असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले हे संत भक्तीमध्ये तल्लीन होऊन जात असत. इंग्रज सरकारने ही कधी मंदिरे बंद केली नाहीत, भक्तीच्या आड तेही आले नाहीत. परंतु टल्ली होणाऱ्या दारुड्या साठी दारू ची दुकाने उघडे ठेवणाऱ्या उद्धव सरकारने भक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांना मात्र मंदिरात जाण्यापासून रोखले. नशेत टल्ली होणाऱ्या लोकांसाठी बार मधील त्यांच्या वेळा वाढवल्या परंतु भक्तीमध्ये तल्लीन होऊन स्वतःच्या मानसिक आरोग्य सुदृढ करणाऱ्या वारकऱ्यांना मात्र मंदिराचे दरवाजे बंद केले . वास्तविक पाहता कोरोना सोबत लढताना मानसिक स्वास्थ्य सुदृढ असणे गरजेचे आहे, त्यासाठी मंदिरांमधील पूजाअर्चा निश्चितच उपयोगी पडते .कोरोना वर मात करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून मंदिरही सुरू करता आली असती, परंतु हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते . सत्तेची खुर्ची टिकवताना आपण किती तडजोड करावी? साक्षात देवालाही आपण फसवल. देवालाही आपण फसवाल असे वाटले नव्हते .आपण कुठल्या पक्षाचे प्रमुख आहात ,आपल्या पक्षाची विचारधारा काय आहे याचेही भान या सत्तेपाई आपल्याला राहिले नाही याचे दुःख वाटते.
मंदिर बंद ठेवणाऱ्यांमध्ये आणि ज्यांनी आपली मंदिरे पाडली त्यांच्यामध्ये फरक तरी काय उरला आणि यावरून असे सिद्ध होते की या सरकारची विचार सरणी सुद्धा मंदिरे पडणाऱ्याच्या विचार सरणी सोबत आहे .
अजूनही वेळ गेलेली नाही तात्काळ मंदिरे सुरू करा या मागणीसाठी 13 ऑक्टोबर 2020 रोजी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने सकाळी 10 ते दु 2 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आ सौ श्वेताताई महाले पाटील उपोषणा दरम्यान मंदिरे विविध धर्माच्या प्रार्थना स्थळाला भेट देणार आहे . तरी भाविक भक्तांनी या लाक्षणिक उपोषणा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केलेले आहे .
आ. सौ श्वेताताई महाले देणार विविध प्रार्थना स्थळाना भेटी
दि. 13 ऑक्टोबर 2020
ठिकाण :- रेणुका माता मंदिर परिसर.
वेळ :- सकाळी11 वाजता
दु 12 वा बौद्ध विहार , पुंडलिक नगर चिखली
दु 2 वा सैलानी दर्गा.
संध्याकाळी 6 वा जैन मंदिर डासाळा येथील मंदिरे व प्रार्थना स्थळांना भेटी देऊन सरकारकडे मंदिरे व प्रार्थना स्थळे उघडण्यासाठी आग्रही मागणी करणार आहे.