अर्चना फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेल्या सर्व योजना पूर्वरत सुरु राहणार. याबद्दल निर्माण करण्यात आलेले समज चुकीचे. महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत १० सप्टेंबर २०२० किंवा त्यानंतर करार संपलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्यस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत.
त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात येणार नाहीत. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन मिळणार आहे. सध्याच्या मानधनात कपात करण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.