वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार Adv आकाशभाऊ फुंडकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक केतन भाऊ पेसोडे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी व कार्यकर्त्यांनी स्वतःहून आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.