प्रा. सुदेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, उन्हाळी 2020 पदवी व पदव्युत्तर परीक्षा दि. 12 ऑक्टोबर, 2020 पासून सुरु होत आहे. परीक्षेला प्रवेशित, माजी व बहि:शाल विद्याथ्र्यांची परीक्षानिहाय परीक्षा क्रमांक सूची विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर (एक्झामिनेशन – अॅडमिशन कार्ड) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर सूचीमध्ये नाव असल्यास नमूद परीक्षा केंद्रात जावून विद्याथ्र्यांनी आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र प्राप्त करतेवेळी सोबत आय.डी. प्रुफ घेवून जावे, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरीता परीक्षा विभागाचे सहा. कुलसचिव सौ. मोनाली तोटे (9763833969) व श्री दिपक वानखडे (9420128684) यांचेशी संपर्क साधता येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर यांनी दिली.