प्राप्त 351 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
• 165 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 394 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 351 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 273 तर रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 351 अहवाल निगेटीव्ह आहेत.
*पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे -*
मोताळा तालुका : तालखेड 1, पिंप्री गवळी 1, फुली 1, सांगळद 1, आडविहीर 1, धामंदा 2, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : सावळी 1, चांडोळ 1, दे. राज शहर : 1, दे. राजा तालुका : सावंगी टेकाळे 1, चिखली शहर : 3, सिं.राजा तालुका : रिधोरा 2, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : दहीगांव 1, मेहकर शहर : 6, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, पिं. माळी 1, मोळा 1, लोणी काळे 1, जळगांव जामोद तालुका : सातोळी 1, शेगांव तालुका : जलंब 1, खामगांव शहर : 5 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान सुलतानपूर ता. लोणार येथील 65 वर्षीय पुरूष व बुलडाणा येथील 63 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 165 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे –
दे. राजा : 1, मेहकर : 14, नांदुरा : 15, जळगांव जामोद : 3, खामगांव : 22, शेगांव : 22, मोताळा : 15, मलकापूर : 15, संग्रामपूर : 5, लोणार : 19 , बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 22, चिखली : 12.
तसेच आजपर्यंत 33246 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7059 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7059 आहे.
आज रोजी 668 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 33246 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7914 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7059 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 751 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 104 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.