वऱ्हाड दूत IMPACT
बुलडाणा : कोरोना महामारीच्या काळात रुग्णासाठी महत्त्वाचा समजला जाणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी केली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील शासकीय कोविड हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल एका 54 वर्षीय कोरोना संशयित महिला रुग्णाच्या नातेवाइका कडून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला लावण्यासाठी तब्बल 10 हजार रुपये अतिदक्षता कक्षात कार्यरत कंत्राटी कक्ष सेवक सागर जाधव याने घेतल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईकाने कोविड रुगनालायाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ सचिन वासेकर यांच्या कडे 7 ऑक्टोबरला सकाळी केल्याने येथील आरोग्य विभाग हादरुन गेला आहे. ही खळबळजनक घटना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा मुख्यालयी घडली आहे.या घटनेला आरोग्य प्रशासनाने गंभीरतेने घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश घोलप यांनी तात्काळ 5 सदस्य चौकशी समिती स्थापन केली आहे.तर उपचारा दरम्यान 6 ऑक्टोबरच्या मध्य रात्रि त्या महिला रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देतांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश घोलप म्हणाले …