मुल (ता. २३ एप्रिल २०२५): चंद्रपूर जिल्ह्यात भीषण उष्णतेने कहर केला असून तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, मुल यांच्या वतीने माननीय आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मुल तालुक्यातील सर्व शाळा, कॉन्वेंट व महाविद्यालयांना तातडीने सुट्ट्या जाहीर करण्याची किंवा शालेय वेळेत आवश्यक बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उष्णाघात, डिहायड्रेशन यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांचा विद्यार्थ्यांना मोठा धोका असल्याचे युवा मोर्चाचे श्री. राकेश ठाकरे यांनी सांगितले.
प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, हीच आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. निवेदन देताना नंदू भाऊ रणदिवे, मिलिंद भाऊ खोब्रागडे, मुन्ना कोटगले बेंबाळ, मनोहर मेश्राम मूल, रुपेश अल्लीवार चांदापूर, रुपेश गड्डमवार बेंबळ, धीरज पाल चांदापूर, सुधाकर गोहने बेंबाळ, हॆ उपस्थित होते.