शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास हेच ध्येय – आ. डॉ. संजय कुटे

0
515

प्रभाग ७ व ८ मध्ये ३ कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन
शेगाव: येथील प्रभाग ७ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत जगदंबा नगर ते म्हाडा कॉलोनी काँक्रीट नाला बांधकाम तसेच प्रभाग ८ मध्ये भूगटार पूर्ण झालेल्या ठिकाणी डांबरीकरण व नाली बांधकाम या ३ कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन माजीमंत्री आ. डॉ. संजय कुटे व नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई पांडुरंग बूच यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी जगदंबा नगर मध्ये करण्यात आले आहे.

पावसाळ्यात जगदंबा नगर व व्यंकटेश नगरात गटारांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले होते त्यामुळे माजीमंत्री आ.डॉ.संजय कुटे व नगराध्यक्षा सौ.शकुंतला बूच यांच्या पुढाकाराने या भागातील सांडपाणी काढून टाकण्यासाठी यापूर्वीच भूगटार योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे तर आता सांडपाणी काढण्यासाठी नाला बांधकाम करण्यात येणार असल्याने या भागातील गटारांची समस्या पूर्णपणे संपणार असून शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी आ.डॉ.संजय कुटे यांनी केले आहे. यावेळी भाजपनेते शरदसेठ अग्रवाल, पांडुरंग बूच, उपाध्यक्ष सौ.ज्योतिताई कलोरे, बांधकाम सभापती सौ.रत्नमाला ठवे, पाणीपुरवठा सभापती गजानन जवंजाळ, जिल्हा सरचिटणीस संतोषबाप्पू देशमुख, स्थायी समिती सदस्य पवन महाराज शर्मा, अल्काताई खानझोडे, माजी सभापती संजय कलोरे, भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे, विधी आघाडी शहराध्यक्ष ऍंड. समीर मोरे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके, राजुभाऊ अग्रवाल, शिवसेनेचे संतोष घाटोळ, भाजपचे अशोक चांडक, नितीन शेंगोकर, नगरसेवक प्रदिप सांगळे, मुख्तार ठेकेदार, प्रफुल ठाकरे, दिनेश शिंदे, आशिष गनगने, शैलेश डाबेराव, पुरुषोत्तम हाडोळे, प्रशांत मेहेंगे, मुकिंद खेळकर, शे.महेबूब शहा, राजेंद्र शेंगोकार, शंकर माळी, यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमचे संचालन नगरसेवक प्रदिप सांगळे यांनी केले.

 

Previous articleकोरोनाचे पार्श्वभूमीवर आपल्या गावीच राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करावी
Next articleनाफेड अंतर्गत आधारभूत किंमत योजनेच्या उडीद, मुग व सोयोबीन खरेदी केंद्राचा आ. आकाशदादा फुंडकर यांच्याहस्ते शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here