मूल:- पंधरा दिवसांपूर्वीच मुल पोलिसांनी प्रेस नोट काढून “गुमशुदा” विद्यार्थिनीची माहिती देण्याचे आवाहन केले, या आवाहनासोबतच मूल पोलिसांनी तीच्या शोधासाठी शोध मोहीम राबविली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यात मूल पोलिसांना यश आले. मूलची विद्यार्थिनी आसाम येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आसाम पोलिसांच मदत घेत
साक्षीला सुखरूप मुल येथे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. मुलींनी अनोळखी व्यक्तींचे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये असे आवाहन करणारे पिडीतेने मनोगत व्यक्त केले.
पोलिसांनी दिलेली प्रेस नोट अशी
दिनांक १९/०३/२०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की, त्यांची मुलगी (वय १८ वर्षे) ही मौजा मुल येथील कर्मविर महाविद्यालय येथे बी.ए प्रथम शिक्षण घेत असुन ती कॉलेजला जाते म्हणुन घरुन गेली परंतु ती रात्र होवुनही घरी परत न आल्याने वडीलांनी पोलीस ठाणे गाठुन मिसींग दाखल केले. मुल पोलीस ठाणे प्रभारी प्रशि. उप अधीक्षक प्रमोद चौगुले यांनी सदर प्रकरणाची दखल घेवुन एक शोध पथक तयार केला. सदर पर्थकामध्ये पोलीस स्टेशनचे सपोनि सुबोध वंजारी, मपोउपनि वर्षा नैताम, पोहवा /२३९७ भोजराज मुंडरे, पो.अं./१३९ संदिप चौधरी यांची नेमणुक केली. शोधकार्या दरम्यान सदर मुलीकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन सायबर सेल कडुन घेण्याात आले तेव्हा सदर मुलीचे लोकेशन कचर जिल्हा आसाम राज्य येथील दिसल्याने मुल पोलीस ठाणे प्रभारी प्रशि. उप अधीक्षक प्रमोद चौगुले
यांनी मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचेशी चर्चा करुन बाहेर राज्यात जाण्याची परवानगी घेवुन मा. पोलीस अधीक्षक जिल्हा कचर आसाम राज्य यांना पत्रव्यवहार करण्यात आले व शोध पथकाला तात्काळ आसामकरीता रवाना करण्यात आले. तोवर आसाम पोलीसांना मुलीचे लोकेशन व फोटो पाठवुन तिला ताब्यात घेण्याबाबत कळविले. शोध पथक दोन दिवसांनी आसाम राज्य येथील कच्चर जिल्हा येथे पोहचुन मा पोलीस अधीक्षक मा माहत्ता व अपर पोलीस अधीक्षक रंजित पॉल यांना भेटुन त्यांचे मार्गदर्शनात उदरबोंड पोलीस स्टेशन चे प्रभारी सी-इंम-सिम्स-तिमुंग यांचे तसेच त्याचे पथकाचे सहयोगाने सदर मुलीस ताब्यात घेवुन मुल येथे परत आले व तिचे आईवडीलांचे ताब्यात दिले.
सदर पिडीत मुलीस विचापुस केली असता तिने तिची आपबिती सांगुन तिच्या मैत्रीनींना तसेच ईतर मुलींना संदेश दिला आहे तो खालीलप्रमाणे:-
इंन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॉपचॉट आयडी वरून ओलल्या अनोळखी फॅन्डरिक्स्टेला अॅक्सेप्ट केल्याने तिला समोरच्या व्यक्तीकडुन प्रेमाचे जाळयात ओढुन तिला लग्नाचे आमीष देवुन ब्लॅकमेल करण्यात आले व आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी तिला आसाम येथे जाण्यास भाग पाडले तरी अश्या कोणत्याही फ्रेंडरिक्वेस्टला बळी पडु नका असे संदेश देवुन सुखरूप येवुन आईवडीलांना भेटल्याने सदर मुलींने पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे तसेच प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मुल पो. उप अधीक्षक, प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात पोलीस शोध पथकाने तांत्रिक सेलच्या सहयोगाने पार पाडली.
मूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिढीचा फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसविल्या गेली आणि यातच ती आसामात गेली.
मुल पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोट नुसार तिला आसाम येथून सुखरूप आणले मात्र तिची फसवणूक करणारे कोण याबाबत कोणताही उल्लेख नाही. फसवणूक करणाऱ्याना अटक केली का? दहा ते पंधरा दिवस ती कुणाच्या मदतीने आसाम सारख्या परप्रांतात राहत होती? तिची फसवणूक कशी झाली? याबाबत कोणताही उल्लेख नाही. किंवा कोणावर गुन्हा दाखल केला याबाबतही प्रेस नोट मध्ये उल्लेख नाही. त्यामुळे साक्षी आसाम पर्यंत गेली कशी? कुणी तिला फसविले? याबाबतचे गुढ कायम आहे.