मूल:- विद्या शिक्षक प्रसारक मंडळ मूलद्वारा संचालित १९९१ पासून मूल शहरात आठवळी बाजार परिसरात माणिकराव जगताप यांनी सुभाष प्राथमिक शाळा सुरू केली. आज ही शाळा भरभराटीस आली आहे. ही शाळा इंग्रजी माध्यमातील शाळांना लाजवेल अशी प्रगती करीत असल्याची माहिती मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव अविनाश जगताप यांनी दिली. यावेळी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष नरसिंग गणवेंनवार यांनी आपण गरीब विद्यार्थांच्या हितासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.