मूल:- जागतिक महिला दिनानिमित्त ओम चैतन्यप्रभू बहुउद्देशीय संस्थे तर्फे कविता कार्यशाळा व कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मंजुळा बाई कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुमन चिताडे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवयित्री शशीकला गावतूरे, सुधाताई चरडूके, तेजस्विनी नागोसे, संजिवनी वाघरे,पुष्पा लाडवे , कवयित्री वृंदा पगडपल्लीवार, कवयित्री वर्षा भांडारकर यांच्या उपस्थितीत कविता वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक कविता संगोजवार, द्वितीय क्रमांक शिल्पा कापसे, तृतीय क्रमांक मिनाक्षी राईंचवार यांनी पटकावला. स्पर्धेत कवयित्री प्रतीमा नंदेश्वर, सुचीका बुक्कावार , वैष्णवी कोलप्याकवार,हिना राजा, माधुरी लेनगुरे, पपीता झरकर, कत्रोजवारताई, अल्का राजमलवार , सपना निगडे, वंदना वाकडे, कुमुदिनी भोयर मिनाक्षी छोनकर यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमासाठी उषा गोहणे, पूजा देशमुख, दिपाली मांडवकर यांनी परिश्रम घेतले. संचालन शुभांगी भोयर तर आभार प्रदर्शन सुधाताई चरडूके यांनी केले.