मूल : इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना….. म्हणत आज महिलांनी जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्याने येथील योग नृत्य परिवाराच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदिराचे प्रांगणात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यांत आले होते. पहाटे 5.30 वाजता एकत्रीत आलेल्या महिलांनी महिला दिनाची सुरूवात इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना… म्हणत नारी शक्तीचा जयकारा लावला. यावेळी महिलांसाठी पायाला दोरी बांधुन चालणे, बादली मध्यें प्लाॅस्टीक ग्लास टाकणे, फास्ट काॅऊटींग आदि स्पर्धा घेण्यांत आल्या. पायाला दोरी बांधुन चालण्याचा स्पर्धेत नाजुका लाटकर आणि सिमा भसारकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर रोहीणी बनकर आणि सिमा लोनबले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बादली मध्यें ग्लास टाकण्याच्या स्पर्धेत मिनाक्षी बुटले प्रथम क्रमांकाची तर माधुरी चौधरी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. इंग्रजी-मराठी फास्ट काऊटींग स्पर्धेत रंजना चौधरी हया पहिल्या आल्या तर मिराताई शेंडे हयांना दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक महिला दिनाचे निमित्याने काढण्यांत आलेल्या भाग्यवान महिला ड्रा मध्यें सुमन भोयर हया विजेता भाग्यवान महिला ठरल्या. विजेत्या सर्व स्पर्धकांना ज्येष्ठ महिला सदस्या कुसूम कापगते आणि प्रभा सोमलकर यांचे हस्ते ममता संतोषसिंह रावत यांचे वतीने आकर्षक भेट वस्तुंचे बक्षीस देण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योग नृत्य परिवाराच्या समन्वय समिती सदस्या लिना जंबुलवार यांनी केले. यावेळी निवृत्त प्राचार्या मिराताई शेंडे आणि निवृत्त प्राचार्य बंडु गुरनूले यांनी मनोगत व्यक्त करतांना महिला दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचलन वैशाली बोकारे यांनी तर आभार आरती चेपुरवार यांनी मानले. कार्यक्रम आणि स्पर्धा यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, शामला बेलसरे, समता बंसोड, वैशाली काळे, उमा महावादिवार, गुरू गुरनूले, संजय पडोळे, सुरेश देशमुख, मुकेश गोवर्धन आदिंनी परिश्रम घेतले. अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.