डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुका मूल च्या अध्यक्ष पदी दत्तात्रय वारानशीवार यांची निवड

0
67

Mul:- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुका मूलच्या अध्यक्षपदी मूल येथील युवा पत्रकार दत्तात्रय वाराणशीवार यांची निवड करण्यात आली.

चंद्रपूर येथील विश्रामगृहात नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना च्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी मुन्ना तावाडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर मूल तालुका अध्यक्ष पदी दत्तात्रय वाराणशीवार, उपाध्यक्षपदी मेहुल मनियार तर सचिव पदी संजय मेकरलीवार यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतेच दत्तात्रय वाराणशीवार व सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वय इकबाल शेख, विदर्भ समन्वयक सतीश आक्कूलवार, दीपक देशपांडे, राज्य कार्यकारणी सदस्य रजत दायमा, धाराशिव जिल्हा अध्यक्ष रमेश नेटके, नागपूर शहर अध्यक्ष अनिल बालपांडे उपस्थित होते.

Previous articleअपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी
Next articleमहीलांच्या स्पर्धा घेवुन महीला दिन साजरा ;योग नृत्य परीवाराचा स्तुत्य उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here