राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीरात आरोग्य विषयक मार्गदर्शन

0
128

चंद्रपूर:- ( कुमुदिनी भोयर) फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर येथील रासेयो विभाग व्दारा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे आयोजित शिबीरा मध्ये डॉ नंदाली झाडे यानी महिलांच्या आरोग्यावर सविस्तर मार्गदर्शन केले .तर डॉ विश्वास झाडे यानी बौद्धिक स्वास्थ्या साठी शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे मोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमा प्रसंगी विचार मंचावर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे, प्रा डॉ मेघमाला मेश्राम, प्रा सुचिता धाबेकर,प्रा सावधान उमक, प्रा प्रज्ञा मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .कार्यक्रमांचे सुत्र संचालन सरोज देवगडे तर आभार दिव्या वाघमारे यांनी मानले कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,शिबीरातील रासेयो स्वंयसेवीका गावातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे स्मृtam वार्षिक स्नेहसंमेलन 2025 महोत्सव साजरा
Next articleमहिला बचत गटामुळे महिलांचा आर्थिक विकास व सक्षमीकरण होते -प्रा.डाॅ.संजय बेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here