चंद्रपूर:- फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित एफ.ई.एस.गर्ल्स कॉलेज व माजी विद्यार्थिनी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्ष मुल, प्रमुख अतिथी सौ.स्मिता खोब्रागडे नृत्य शिक्षिका गडचिरोली, सौ.प्रज्ञा जीवनकर, निवेदिका आकाशवाणी चंद्रपूर,सौ.अनिता बोबडे, शिक्षिका,सौ.पुष्पा वांढरे इत्यादी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रज्ञा जुनघरे इ.मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सावित्रीमाईंच्या जीवनावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत कु.रजिया शेख , प्रथम,कु.रागिनी खाडिलकर, द्वितीय,कु.तक्षा आवळे, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना माजी विद्यार्थिनी अनिता बोबडे यांनी अनुक्रमे 500 रु,300 रु,200 रु.रोख बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले.संगीत विभागातील कु.सोनाली यादव या माजी विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले रचित, संगीत विभाग प्रमुख प्रा.अशोक बनसोड यांनी स्वरबद्ध केलेले गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष, माजी विद्यार्थिनी रत्नमाला भोयर यांनी आपला जीवनप्रवास सांगितला आणि ध्येय, चिकाटी,मेहनत, आत्मविश्वास, निर्णयक्षमता असेल तर निश्चित ध्येय प्राप्त करता येते,असा विद्यार्थिनींना मोलाचा संदेश दिला.
स्मिता खोब्रागडे यांनी स्त्री जीवनाच्या दिशादर्शक सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रज्ञा जीवनकर यांनी आपले विद्यार्थी जीवन विद्यार्थिनींपुढे व्यक्त केले आणि सावित्रीची लेक म्हणून स्वतःमधील क्षमता शोधून स्व अस्तित्व निर्माण करणे हेच आपले कर्तव्य आहे आणि हीच सावित्रीमाईंना खरी आदरांजली असेल,असेल मौलिक विचार व्यक्त केले.पुष्पा वांढरे यांनी विद्यार्थिनींनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे,असे मार्गदर्शन केले. प्रा.डाॅ.प्रज्ञा जुनघरे यांनी माजी विद्यार्थिनी संघटनेची भूमिका मांडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.राजेश चिमनकर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.आम्रपाली देवगडे यांनी केले तर आभार प्रा.सुचिता धाबेकर यांनी मानले.सदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.