मूल:- राजमाता कुणबी महासंघ बचत गट , स्त्रीशक्ती ग्रुप व जिजाऊ ब्रिगेड ग्रुप मूल तर्फे योगभवन येथे आज सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. रत्नमाला भोयर यांनी नाटिका सादर केली तर भावना चौकुंडे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला माजी नगर अध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष संजीवनी वाघरे, स्त्रीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष कु. कुमुदिनी भोयर, सामाजिक कार्यकर्त्या भावना चौकुंडे तसेच गटाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.