मुल येथिल दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह बोरचांदली येथील विहिरीत दुपारी ४ वाजताच्या सुमारास आढळला. मुल वार्ड क्र. १० येथील मिलिंद जनार्दन खांबळकर वय ( ४५ ) हा व्यक्ती दोन दिवसापासून बेपत्ता होता. १५ डिसेंबरला मुल तालूक्यातील बोरचांदली महेश कटकमवार यांच्या शेतातील विहीर मृतदेह आढळला. ही आत्महत्या आहे की हत्या याचा पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.