सावली तालुक्यातील पारडी या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या १०६ चिमुकल्यांना शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारातू विषबाधा झाली. ही बातमी कळताच मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे तात्काळ निर्देश दिले. आता या सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. यातील काही मुले उप जिल्हा रुग्णालय मूल येथे 62 विद्यार्थी उपचार घेत आहे. मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार या मुलांची आणि पालकांची भेट घेऊन प्रकृतीची आम्ही विचारपूस केली.सुधीर भाऊ सर्वोतोपरी सगळ्यांच्या सोबत आहे हे आश्वासन सर्व पालकांना दिले.या वेळी संतोष अतकारे स्वीय सहायक, बंडू गोरकर, नंदकिशोर रणदिवे, राकेश ठाकरे,किशोर कापगते,रुपेश मारकवार,संजय मारकवार, प्रवीण मोहुर्ले,गौतम जीवने मदतीस उपस्थित होते.