ट्रॅक्टरच्या धडकेत पती ठार, पत्नी व दोन मुले गंभीर जखमी

0
739

मूल तालुक्यातील एस एम लान येथे नातेवाईकांच्या स्वागत समारंभासाठी जात असताना दुचाकी स्वाराला विरई गावातील वळणावर ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. या अपघातात पती जागीच ठार झाला, तर पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

गणेश गजानन गिरडकर (वय 38, रा. वीरई [पेठ]) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी निराशा गणेश गिरडकर (वय 30), मुलगा ऋषभ (वय 10) आणि श्रेयस (वय 5) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारांनंतर चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

Previous articleमूल शहरात भूकंपाचा धक्का – खगोल तज्ञ काय म्हणतात?
Next articleविषबाधा झालेल्या रुग्ण विद्यार्थ्यांची केली विचारपूस ; मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here