कर्मवीर कन्नमवार यांचा अपमान करणाऱ्यांना घरी बसवा – डॉ. अभिलाषाताई गावतूरे

0
179

मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे योगदान आमच्या सारख्या समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती दायक वाटावे असेच आहे. समाजाच्या मागासवर्गात जन्म घेतलेली एक व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्रीपद प्राप्त करते ही सामाजिक इतिहासातील अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. कर्मवीर कन्नमवार हे विदर्भाची शान आहेत. चंद्रपूरकरांसाठी तर ते प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे. भद्रावती येथील आयुध निर्माण सारखे मोठे प्रकल्प आणून हजारो लोकांना रोजगार पुरविणारे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील खरे विकास पुरुष हे दादासाहेब कन्नमवार आहेत.

लाखोंची प्रेरणा बनलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना येथील तथाकथित विकासपुरुषाची जीभ घसरली. त्यांनी जाहीर सभेतून बोलतांना त्यांचा अपमान केला.

दादासाहेब कन्नमवार पेक्षा ही स्वतःला मोठे समजणाऱ्या मंत्र्याला महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही. लोकसभेच्या वेळी असेच महिलांबद्दल अपमानजक व्यक्तव्य केल्याबद्दल त्यांचा दारून पराभव झाला होता. व आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी केले, त्या मारोडा येथील आपल्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलत होत्या.

या सभेला प्रवीण गावातूरे,सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे,कवडुजी येणप्रेड्डीवार शेतकरी संघटना,उमाजी मंडलवार जेष्ठ प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ, श्री. कोठारेजि तेली महासंघ,

दीपक काका वाढई ,प्रा. नामदेव कोकोडे आदी.विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. या सभेला मारोडा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

Previous articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा संतोषसिंह रावत यांना जाहीर पाठींबा
Next articleवनमंत्री सुधीर मुनगंटीवार व रावत यांच्यामध्ये धक्काबुक्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here