मूल : होवू घातलेल्या ७२ बल्लारपूर विधानसभा मतदार संघ निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर महाविकास आघाडीने धर्मनिरपेक्ष वादाची भूमिका स्वीकारल्यामुळे भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया ( Reformist) पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण देविदास कांबळे यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संतोषसिंह रावत यांना जाहीर पाठिंबा लेखी पत्राद्वारे दर्शविला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. संतोषसिंह रावत यांचे कार्यालयात जाऊन आपल्या पक्षाच्या पाठिंब्याचे पत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील शेरकी, रूपल रावत यांना दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुभाष गायकवाड, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमराव कांबळे, युवक काँग्रेसचे गणेश रणदिवे, प्रामुख्याने उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पार्टीचा पाठिंबा जाहीर करुन महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना समर्थन दिल्याने संतोष सिंह रावत यांचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.