आज क्रांतिभूमी चिमूर येथे प्रचारासाठी झालेल्या मा.राहुल गांधी यांच्या सभेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आलेली काँग्रेसची लाट आणखीनच उसळली. सामान्य जनतेसोबतच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वारे सळसळू लागले. बल्लारपूर मतदार संघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मंचावरून या न्याय योध्याचे मार्मिक मार्गदर्शन ऐकता आले. राहुलजींच्या हृदयस्पर्शी संवादाने जिल्हाभरातून आलेला जनसमुदाय प्रेरित झाला. यावेळी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल जी, ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला जी, छत्तीगढचे माजी मुख्यमंत्री बघेल साहेब, आमचे तडफदार नेते विजयभाऊ वडेट्टीवार तसेच चिमूर मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार डॉ. सतीश वारजुरकरजी यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राहुजींनी वैयक्तिक संवाद साधत बल्लारपूर मतदार संघातील शेतकरी, युवक आणि भगिनींच्या सेवेसाठी आणि खुंटलेला विकास करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या, प्रोत्साहन दिले.