१९८९ प्रचार सभेसाठी अटलबिहारी वाजपेयी चंद्रपुरला आले होते. मंचावरील सर्व नेत्यांची भाषणे होता होता बराच वेळ निघून गेला. तेवढ्यात वाजपेयींचे आगमन झाले. येताच त्यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले, पण ते म्हणाले की, ‘उम्मीदवार का भाषण हुवा की नहीं?’, त्यावर त्यांना नकारार्थी उत्तर मिळाले. तेव्हा ते म्हणाले, ‘नहीं. पहीले उम्मीदवार का भाषण होना चाहिये. वक्त की किल्लत है, लेकीन पांच मिनट आप उम्मीदवार का भाषण किजीये.’ असं म्हटल्यावर सुधीरभाऊ भाषणासाठी उभे झाले आणि केवळ साडेतीन मिनीटांत तडाखेबाज भाषण ठोकले. वाजपेयी त्यांच्या भाषणाने अत्याधिक प्रभावित झाले आणि स्वतः भाषणासाठी उभे झाले तेव्हा म्हणाले की, ‘ये लडका बहुत आगे बढेगा. आगे जाकर समूचे महाराष्ट्र में भाजप का नेतृत्व करेगा.’ त्यानंतर २१ वर्षांनी २ एप्रिल २०१० ला सुधारभाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली.