स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेली तरीही आदिवासींच्या जीवनमानात काहीही बदल घडून आलेला नाही.प्रस्थापित राजकीय पार्ट्याने केवळ आदिवासि मतांचा वापरच केला आहे.त्यामुळे आता आदिवासी समाजाला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जल,जंगल,जमीन व आदिवासी संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय गोंडवाना पार्टी ही कटिबद्ध असून आदिवासींच्या न्याय हक्कासाठीच या पार्टीची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. अभिलाषाताई गावतुरे या नेहमीच आदिवासी समाजाच्या हाकेला धावून आल्या आहेत. आदिवासी समाजामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा देणे,वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना किंवा मृत पावलेल्यांना नुकसान भरपाई मिळावी, कसत असलेल्या वनजमिनीचे पट्टे मिळावे, आदिवासी बहुल भागात पेसा कायदा लागू करावा यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
त्यामुळे आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी व आदिवासी समाजाचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद करण्यासाठी डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या पाठीशी आदिवासी समाजाने भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रीय गोंडवाना पार्टी चे प्रदेश अध्यक्ष राकेश राजू भलावी,प्रदेश सचिव कमलेश नैताम, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशील कोडापे
यांनी केले आहे.