मुनगंटीवारांना पाठिंबा नाही- बापूजी गणपत मडावी

0
289

बल्लारपूर:- जिल्हाध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष जगन येलके हे आदिवासी समाजाची दिशाभूल करत असून मुनगंटीवार यांना पाठिंबा असल्याचे खोटे पसरवत आहेत. जगन येलके यांची पार्टीने हकालपट्टी केलेली असून त्यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीशी काहीही संबंध नाही. पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जगन येलके यांना हाताशी घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नावाचा गैरवापर करून जे घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचा मुनगंटीवार यांना पाठिंबा नाही. त्यामुळे पसरविण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांना, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी यांनी केले आहे.

Previous articleदेवाडा खुर्द येथे संतोषसिंह रावत यांना पाठिंबा 
Next articleराष्ट्रीय गोंडवाना पार्टी च्या समर्थनामुळे अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना बळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here