तळोधी (बा.) / प्रतिनिधी
चिमुर विधानसभेकरीता उभे असलेले उमेदवार केशव रामटेके हे प्रचार वाहणातुन पडल्याने जखमी झाले झाले आहेत.
सध्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असुन सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान रिपाइं पुरस्कृत अपक्ष उमेदवार केशव रामटेके हे प्रचार गाडीतुन खाली पडले. सदर घटना काजळसर गावालगत घटली असुन त्यांना त्वरीत मोटेगाव येथिल डॉ.पर्वते यांचे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारा दरम्यान प्रकृती स्थिर असुन चार दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती तालुका अध्यक्ष मच्छिंद्र खोब्रागडे यांनी दिली आहे.