मूल : होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखील भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा मूलच्या कार्यकारीणीची सभा अशोक येरमे यांचे निवासस्थानी आज पार पडली. सभेत आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टीने आणि शासनकर्त्याकडून होत असलेल्या अन्याया विरूध्द आदिवासी समाजाने एकसंघ होणे आवश्यक आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय केला. पेसा कायदा लागु करण्याचे आश्वासन देवून आचारसंहिते पर्यंत लागु केला नाही, निवडणुकीच्या धामधुमीत मात्र मतांसाठी आदिवासी समाजाच्या हितासाठी पेसा कायदा लागु करण्याचे आश्वासन देवून आदिवासी समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा- महायुतीची ही कृती आदिवासी समाजाने समजून उमजून यांचे पासून सावध राहणे गरजेचे आहे. असा ठराव पारीत करतांना होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांना पाठींबा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यांत आले. सभेला तालुका अध्यक्ष अशोक येरमे, उपाध्यक्ष सुरेशपाटील कुळमेथे, सचिव किशोर पेंदाम, कोषाध्यक्ष चंद्रशेखर जुमनाके, योगीराज पेंदाम, लालचंद मसराम, देवीदास उईके, गुणाजी कन्नाके, प्रमोद कुळमेथे, ज्ञानेश्वर मडावी, ब्रम्हानंद मडावी, प्रेमदास गेडाम, मनोहर मडावी, नागोराव सिडाम, जनार्दन आत्राम, भोजेंद्र गेडाम, सोमेश्वर मडावी, छगन मडावी, आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.