मूल तालुक्यातील भात पिक हे खरिप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पिक असुन सध्या ते कापणीच्या अवस्थेत आहे. बहूतांश गावामध्ये भात पिकाच्या लोंबीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्याच्या पाहणी करीता श्री. चंद्रकांत ठाकरे कृषि उपसंचालक, चंद्रपुर, श्री. गजानन पवार उप विभागीय कृषि अधिकारी चंद्रपुर, श्री. विनोद नागदेवते व शात्रज्ञ के.वि. के सिंदेवाही, श्री. सुनिल ज्ञा. कारडवार ता.कृ.अ. मूल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राठोड मं.कृ.अ. मूल श्री. गजभिये कृ.प. मूल, श्री. चट्टे कृ.स. श्री. नेवरे कृ.स. कु. गोपवार कृ. स यांचा पथकाने मौजा राजोली, डोंगरगाव, चिखली, चितेगाव, बेलगाटा येथिल शेतकऱ्यांचा शेतावर भेटी देऊन मार्गदर्शन केले.
के.वि.के. सिंदेवाहीचे वरिष्ठ शात्रज्ञ नागदेवते मागदर्शन करतांना म्हणाले की, ही अळी टोळीने पिकावर आक्रमण करते. रात्रीच्या वेळी भात पिकाची लोंबीला कुरतडते त्यामुळे लोंबीचे तुकडे जमिनीवर पडलेले आढळतात व दिवसा पिकाच्या चुडात लपुन बसते. त्यामुळे भात पिकाचे २५ ते ४० टक्के पेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यानी वेळीच पिकावर इमॅमेक्टीन बेन्झोएट किंवा प्रोफेनोफॉस किंवा सायपरमेथ्रिन यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी व पिकाचे नुकसान टाळावे. यावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.