रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
देशात संविधान रक्षणाकरिता सर्वांनी महाविकास आघाडीच्या बाजूने राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी पाठिंबा देताना रिपाईच जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे यांनी सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष कोल रामटेके, जिल्हा कार्याध्यक्ष लाजर कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष बाजीराव उंदीरवाडे यांनी पत्रक प्रसिद्ध करून रिपाईच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले आहे.