बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रचार सभा उत्साहात संपन्न झाली. प्रचंड जनसमदायाच्या उपस्थितीमध्ये बल्लारपूर मूल बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय उमेदवार डॉ. अभिलाषा ताई गावतुरे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षापासून करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेली निस्वार्थ सेवा यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अभिलाषा गावतुरे यांना प्रचंड जन समर्थन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
समाजातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जोरदार समर्थन डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना मिळत आहे. विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षभेद बाजूला सारत डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत कोठारी येथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हा सचिव श्री अतुल ठाकरे यांनी डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.राका चे हिराचंद बोरकुटे,भीम आर्मीचे सुरेंद्र रायपूरे, बहुजन समाज पार्टीचे राजेश ब्राह्मणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नीरज वाळके यांनी कुठल्याही पक्ष धोरणाची तमा न बाळगता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रामानिक कार्य करणाऱ्या
डॉक्टर म्हणून पाठिंबा जाहीर केला आणि प्रचार करण्यासाठी सज्ज झाले. जुनोण्याचे सरपंच विवेक शेंडे, कारव्याचे माजी पंचायत समिती सदस्य विनोद सीडाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गणपत नैताम, नथू पाटील वांढरे, अमन पसंत कमिटीचे ताहीर भाई हुसेन, अतिक भाई शेख, बशीर खान, शेख जाकीर, गणेश बुटले, गोवारी समाज संघटनेचे सतीश नेवारे, चिचपल्ली चे संतोष भाऊ तोडासे, सुनील बावणे, मानोराचे मोहन पवार, कोर्टी मक्त्याचे साईनाथ तायडे, कोर्टीचे रवींद्र भाऊ टोंगे, बामणीच्या तंजीला सय्यद मॅडम, करुणाताई शेगोकार, नाहीद हुसेन, तुळशीराम कंबलवार, विसापूरचे अशोक भाऊ चिताडे आणि राजूभाऊ लांडगे इत्यादी सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.कोणत्याही पक्षाने अभिलाषा ताईंना तिकीट दिली नसेल तरी आम्ही जनतेने अभि लक्ष त्यांना तिकीट दिली आहे अशी घोषणा सर्व उपस्थित मान्यवरांनी केली आणि अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली.
ज्यावेळी डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी उमेदवार म्हणून बोलताना मुल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये विद्यमान पालकमंत्र्यांनी कुठलेही जनहिताचे काम केले नाही आणि विकासाच्या नावाखाली स्वतःच्या कंत्राटदारांना पोसण्यासाठी फक्त दगड धोंड्याच्या बिल्डिंग बनवण्याचं काम केलं. ना पालकमंत्र्यांचा इथल्या शाळांकडे लक्ष आहे ना येथील दवाखान्यांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत ना कोणता नवीन उद्योग सुरू केला ना कुठल्या नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या उलट सुरू असलेल्या बामणी प्रोटीन सारख्या उद्योगाला सुद्धा बंद होण्यापासून ते रोखू शकले नाही असा आरोप त्यांनी केला.
शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो जिल्हा परिषद च्या शाळा सरकार बंद करत असताना आम्ही त्याविरुद्ध आवाज उचलतो विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो.
आमच्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांचे जीव वाघांच्या हल्ल्यामध्ये जातात म्हणून आम्ही आवाज उचलतो पण पालकमंत्र्यांना आमच्या सर्वसामान्य माणसांच्या जीवाची अजिबात फिकीर नाही, आंमडीची जलसिंचन योजना गेल्या ३० वर्षात पूर्ण करू शकले नाही, शेतकऱ्यांच्या मामा तलावाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने तलाव फुटले शेकडो लोक बेघर झाले आणि लाखोंच्या संपत्तीचे नुकसान झाले यासाठी आम्हाला लढावे लागते पण ज्यांना जनप्रतिनिधी म्हणून निवडून दिले असे जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत अक्षम्य उदासीनता बाळगतात आणि म्हणून या सर्वसामान्य जनतेच्या समस्या जर सोडवायचे असतील तर आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन अभिलाषा ताई गावतुरे यांनी केले.