बल्लारपूर:- डॉ. अभिलाषा गावतुरे या केवळ उमेदवार नसून त्या फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या प्रतिनिधी आहेत.त्यामुळे अभिलाषा ताईचा विजय होणे हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नसून महापुरुषांनी चालवलेल्या आंदोलनाची ती फलश्रुती ठरणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष कायदेतज्ञ व ओबीसी विचारवंतन मा. इंजि. प्रदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या समर्थनार्थ यंग रेस्टॉरंट येथे विविध 40 पुरोगामी संघटनांची चिंतन बैठक पार पडली त्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
डॉ. अभिलाषा ताईंची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे.त्यामुळे कोण जिंकेल पैसा की विचार असा प्रश्न उद्भवला तर केवळ धनशक्ती च्या भरवश्यावर प्रत्येकाला विकत घेता येत नाही आणी म्हणून येथील दलित, आदिवासी, ओबीसी शेतकरी, मजूर हा बहुसंख्यांक वर्ग जर एकत्र आला तर धनशक्ती हरेल व जनशक्तीचाच विजय होईल असे स्पष्ट विचार त्यांनी या याप्रसंगी व्यक्त केले.
या चिंतन बैठकीला ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत मा. हिराचंद बोरकुटे, भूमिपुत्र ब्रिगेड चे मार्गदर्शक डॉ. राकेश गावतूरे, ओबीसी सेवा संघाचे मा. विलास माथणकर, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन भेदे ई. विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.