पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित झाली आहे. या योजनेला सुरू करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वी या योजनेच्या पाइपलाइनमध्ये बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे या गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. ना. मुनगंटीवार यांनी या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले होते.
ना. मुनगंटीवार सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता ही योजना पूर्ववत सुरु झाली आहे. त्यामुळे पोंभुर्णा ग्रीड योजनेतून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चक ठाणेवासना, नवेगाव मोरे, चक नवेगाव, मोहाडा, वेळवा, सेलूर नागारेडी, चक कोसंबी, फुटाणा, देवाडा खुर्द, जाम, रामपूर दीक्षित, बोर्डा दीक्षित, कसरगट्टा, चक घनोटी, जाम खुर्द या 15 गावांना पाणीपुरवठा होत आहे.
अचानक योजनेतील जलवाहिनी फुटल्याने ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याबाबत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. पोंभुर्णा ग्रीड योजनेतून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड गैरयोयीचा सामना करावा लागत होता. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात स्वतः पुढाकार घेतला. ना. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सुरु करण्याचे निर्देश आचासंहिता लागण्यापूर्वी दिले. फुटलेल्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून आता ही योजना पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे आपल्या गावातील पाणी पुरवठा सुरू झाल्यामुळे आता या 15 गावातील नागरिक ना. मुनगंटीवारप्रती आभार व्यक्त करत आहेत.