ना.मुनगंटीवार यांना समाज सुधारक पुरस्कार; व्यसनमुक्ती संघटने केला सन्मान

0
31

प.पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने समाज भूषण समाज सुधारक या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कृत ना.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.सुधाकर चार्लोस्कर प्रदेशाध्यक्ष प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र हे होते. प्रमुख पाहुणे रामदास आदाते हे होते कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुष व संतांच्या फोटोला माल्यरपण करून झाली. कार्यक्रमात *समाज हिताचे काम करणारे ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे प.पुज्य शेषराव महाराज प्रदेश महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने समाजभूषण सन्मान चिन्ह पुरस्कार देऊन ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारू व्यसनमुक्ती वर काम करणाऱ्या जिल्ह्यात लाखो लोक दारू व्यसनमुक्त करणाऱ्या शेकडो संघटनेचा समाज सुधारक सन्मानपत्र व शिल्ड देऊन गौरवण्यात आले . ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी दारूचे दुकान थाटले आहे.त्यामुळे द दारू द पासून देशी पिल्याने द पासून मनुष्य दानव होतो. मनुष्याला दानव करणारे काही नेते करत असून ते सोन्याच्या पाटावर बसून आहे. संघटनेच्या या ईश्वरीय पवित्र कामासाठी मी स्वतः संपूर्ण ताकदीने तन मन धनाने आपल्या सोबत आहों असे मी वचन देतो असू ते यावेळी बोलले . या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सघटनेचे जिल्हाध्यक्ष डोंगरे  लक्ष्मीकांत धानोरकर दिगंबर वासेकर श्री अविनाश राऊत श्री सुरज जिभकाटे.श्री प्रकाश अल्गामकर श्री मारुती वाकुलकर साईनाथ कुंनघाटकर बाळू पिंपळशेंडे गणपत चौधरी श्री बबन गुरणुले .राजू लडके  पिंपळकर महादेव मांडवकर श्री.भोजराज एकोनकर .सेलोरेसर श्री.अरुण बावणे श्री.गुलाब वाघधरे उताम पारधीभाऊजी चापडे यांनी विशेष परिक्षण घेतले कार्यक्रमाचे संचालक गुरुदेव चोपडे यांनी केले.

Previous articleआरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा जगात एकच धर्म ‘मानवता धर्म’,
Next articleना.सुधीर मुनगंटीवार यांना अनेक पक्षांचा पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here