बल्लारपूर -मुल,पोंभूर्णा-चंद्रपूर येथील ४२,१०० रुग्णांना चष्मे वाटप तर २८५० रुग्णांवर मोतीबिंदु शस्त्रक्रिया ती पण मोफत, असे ऐकले तरी आश्चर्य वाटेल, पण असे झाले आहे. सन २०१९ ते २०२४ (कोरोना काळ सोडून) पर्यंत आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा, सगळ्यात मोठा मानवता धर्म मानणारे नाम. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरील रूग्णांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन गावोगावी तज्ज्ञ डॉक्टरांची चमु आणुन आरोग्यशिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजीत करण्यात आल्याचे अनेकांनी बघितले आहे. त्याचा लाभ ही अनेकांनी घेतला आहे. त्याचीच ही वरील आश्चर्य वाटणारी आकडेवारी आहे. या व्यतिरिक्त आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन जवळपास ११२ बालकांवर फोटिंस रूग्णालय, मुंबई येथे निःशुल्क हृदरोग चिकीत्सा यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. २६ रूग्णांवर कर्करोग चिकीत्सा शिबिरांच्या माध्यमातून निःशुल्क उपचार करण्यात आले, या संकल्पनेला मुर्तरूप देण्यात बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार SUDHIR MUNGANTIWAR यांच्या पुढकाराने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्तेहे मोलाची भुमिका बजातित असतात. बरं यात ही आश्चर्य म्हणजे आपल्या संपर्कात आलेला रूग्ण हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे, हे न बघता ‘रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रिद फक्त बोलण्यातुन नाही तर प्रत्यक्ष कृतीतुन उतरविणारे सुधीर मुनगंटीवार हे १५ टक्के राजकारण व ८५ टक्के समाजकारण करणारे राजकारणी आहे. त्यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात येणारे आरोग्यशिबीरे -महाआरोग्य शिबीरे यातुन अनेक रूग्णांवर क्रिटीकल (गंभीर ) ऑपरेशन ही पार पाडण्यात आलीत.