बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातील अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा फेसबुक अंकाउंट हॅक करण्यात आल्याची माहीती डॉ. राकेश गावतुरे यांनी दिली. बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून निर्णायक लढा देण्याची तयारी करणार्या डॉ. गावतुरे यांचा फेसबुक अकाउंट हॅक झाल्यांने तर्क वितर्क केला जात आहे.
बल्हारपूर क्षेत्रातून महाविकास आघाडीकडून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी उमेदवारी मागीतली होती. त्यांना कॉंग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यांचा शब्दही दिला होता. अखेरच्या तारखेपर्यंत त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी आशा त्यांना दाखविण्यात आली. मात्र उमेदवारी संतोष रावत यांना जाहीर झाली. यामुळे नाराज डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, या सर्व घडामोडीत त्यांचा फेसबुक हॅक करण्यात आल्यांने विरोधकांनी जाणीवपूर्वक तर तसे प्रयत्न केले नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पती डॉ. राकेश गावतुरे यांनी फेसबुक हॅक झाल्यांचे सांगीतले.