▪ सोयाबीन सुडीला आग, 2 लाखाची हानी
▪साकेगाव येथील घटना
बुलडाणा : अतिवृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीन जमिनदोस्त केल्यानंतर आता उर्वरीत सोयाबीन सोंगून त्याची सुडी लावण्यात शेतकरी गुंतला असून या सुडीलाही आग लावून शेतकऱ्यांना नुकसान पोहचविण्याच्या घटना घडत आहेत. चिखली तालुक्यातील साकेगाव येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुडीला आग लागून 2 लाखाची सोयाबीन जळून खाक झाल्याची घटना 4 ऑक्टोंबरला सांयकाळी 7 वाजता समोर आली आहे.