मूल:- अंतयात्रेला गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला करून जखमी केले. गौरी महेश वडलकोंडावार हिच्या अंत्ययात्रेला गेलेल्या नागरिकांवर माशांनी हल्ला करून जखमी केले यामध्ये संजय नन्नेवार, आकाश रामटेके, अरविंद घळसे, भूषण गोवर्धन, चंद्रकांत आकेवार, अजय वासेकर मूल तसेच तूम्मे परिवार चंद्रपूर हे जखमी झाले आहे. उपजिल्हा रुग्णालय मुल येथे जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहे. जखमीना दवाखान्यात सामाजिक कार्यकर्ते तसेच संदीप मोहबे यांनी दाखल केले.