पत्नी नांदायला येत नाही म्हणून पित्याने चिरला तीन वर्षाच्या मुलाचा गळा; स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न

0
401

सोहम घाडगे
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पत्नी नांदायला येत नाही या कारणावरून पतीने आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा चाकुने गळा चिरुन ठार मारण्याचा प्रयत्न करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मेहकर तालुक्यातील भालेगाव फाट्याजवळ घडली.
अनिल अवसरमोल रा. मोळी ता. मेहकर त्याच्या पत्नीसोबत मागिल सहा महिन्यापासून पटत नसल्यामुळे ते वेगळे राहतात. अनिल ला त्याची पत्नी ही गोमेधरला असल्याची माहीती पडले. त्याने गोमेधर ला जाऊन पत्नीस त्याच्यासोबत नांदायला चल असे म्हटले परंतू पत्नीने सोबत यायला नकार दिला. अनिलने पत्नी जवळ असलेल्या जय ला पत्नी जवळून जबरदस्तीने नेले. ४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान फोन करुन सांगितले की भालेगाव फाट्यावर मी मुलाला ठार मारतो व स्वत:लाही संपवतो. त्यानंतर काही वेळाने अनिल अवसरमोल हा मुलाला जानेफळ पोलिस स्टेशनला गंभीर जखमी अवस्थेत मोटरसायकलवर पोहचला. ठाणेदार दिलीप मसराम यांनी त्या दोघांनाही उपचारासाठी नेण्यास सांगिते. पिएसआय अशोक काकडे व पोलिस कर्मचा-यांनी त्यांना प्रथम दवाखान्यात नेले. प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी जय अनिल अवसरमोल वय 3 वर्षे याला मेहकर येथील मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले तर अनिल जनार्धन अवसरमोल वय २५ याच्यावर बुलडाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जानेफळ पोलिस स्टेशनला स्वाती अनिल अवसरमोल वय २२ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी अनिल जनार्धन अवसरमोल वय २५ वर्षे रा मोळी ता मेहकर याच्याविरुध्द अ.प नं ३३७\२० कलम ३०७ ,३०९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक अशोक काकडे करीत आहेत.

Previous articleहावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद विशेष गाडया आता दररोज धावणार
Next articleअतिवृष्टीनंतर आता सोयाबीनला आग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here