कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि हजारोंच्या साक्षीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
218

Mul:-  दि.२८- ‘बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरताना मुल शहरात बाजार चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून विजयाची खात्री दिली.*

 

उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल,सौ. सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जि प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, अल्का आत्राम, विद्याताई देवाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, रत्नमाला भोयर,चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, रामपाल सिंह, हनुमान काकडे, राजू बुद्धलवार, किशोर पंदीलवार, निमगडे गुरुजी, वंदना आगरकाटे,रोशनी खान, सुलभा पीपरे ,खेमा रायपुरे,पूजा डोहने,वर्षा लोनबले, किरण गापगते, मंगेश पोटवार, विशाल नागुलवार यासह आदि भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी माध्यमांशी बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आणखी एक पाऊल आज टाकत आहे. माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झालो आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादाची ऊर्जा माझ्यासोबत आहे. सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहताना जनकल्याणाचा वसा पुढे चालविण्याचे ध्येय आहे.’ विकासाचा झंझावात कायम ठेवून बल्लारपूर मतदार संघ राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

 

पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात, या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला.

 

*आर्थिक, क्रीडा अन् शिक्षण*

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या हेतूने बल्लारपूर मतदारसंघात मागील काळात अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेली. बल्लारपूरमधील खेळाडूंच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंग पूल, बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट तयार करण्यात आले. पर्यटन, विज्ञान, आणि रोजगाराचे एक अनोखे मॉडेल म्हणून बोटॅनिकल गार्डनची निर्मिती झाली. बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा आणि जवळच्या गावांमधील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी ग्रामिण आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक केले. विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक शिक्षण सोयीसाठी प्रत्येक तालुक्यात आधुनिक ई-लायब्ररी तयार केली.

 

*महिला सक्षमीकरणासाठी*

मुल तालुक्यात विविध कंपन्यांतून ६०० हून अधिक नागरिक, महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्पेट सेंटर, बांबू हस्तकला केंद्र, अगरबत्ती केंद्र, कुक्कुटपालन फार्म आणि बरेच उद्योग उभे राहिले आहेत. गावागावांमध्ये पक्के रस्ते आणि पुलांच्या निर्मितीमुळे गावांमध्ये भौतिक सुविधांच्या निर्मितीकडे विशेष लक्ष दिले. अनेक विकास कामे झालेली आहे पुढेही विकासाची अनेक प्रकल्प पूर्णत्वास येणार आहेत. विकासाचा हा यज्ञ पुढेही अविरत धगधगत राहणार आहे, अशी ग्वाही देत ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

Previous articleबल्लारपूर मधून संतोष रावत
Next articleजोरदार शक्ती प्रदर्शन करीत संतोष रावत यांचे नामांकन दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here