मुल – माळी महासंघाच्या संघटनात्मक कार्याला गती मिळावी, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व दूर पसरावे या उदात्त हेतूने मुल येथील होतकरू युवा धडाडीचे कार्यकर्ते, अनेक वर्ष युवा आघडीचे पदभार सांभाळणारे राकेश ठाकरे यांना माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे यांनी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बैठकीला माजी जी.प.अध्यक्ष तथा महिला आघाडी प्रमुख संध्याताई गुरनुले, प्रदेश उपाध्यक्ष निलेश खरबडे, नगर सेवक रवी गुरनुले, माजी नगर सेविका वंदना तीखे, ऋषी कोटरंगे, सनिर केने , सूरज मांदाडे, बालगोविंद आदे, रुपेश नीकोडे,ओंमदेव मोहरले, विवेक मांदाडे उपस्थित होते. एका होतकरू धडाडीच्या कार्यकर्त्याची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.एन. कोकोडे , सरचिटणीस चंद्रकांत बोरकर, मार्गदर्शक प्रा.रामभाऊ महाडोळे, विभागीय महासचिव गुरु गुरनुले, बंडूभाऊ गुरनुले, गुरुदास चौधरी, डॉ.पद्माकर लेंनगूरे, हसन वाढई, अनंत लेनगुरे यांचेसह माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी राकेश ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.