सावंगी येथे गोठ्यात घुसून बिबट्याने केला गोरा ठार

0
78

तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील घटना.तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या व तळोदी बीटातील सावंगी या गावातील शेतकरी श्रीराम बिजाराम मलगाम यांच्या गोठ्यामध्ये घुसून काल रात्री पहाटे चार वाजता चे आसपास बिबट्याने हमला करून गोऱ्याला ठार केले व त्याच्यावर ताव मारून निघून गेल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सावंगी येथील रतिराम रंधये यांच्या घरामध्ये घुसून दोन शेळ्यांना ठार करून बिबट घरातील अठाऱ्यावर दळून बसला व रात्रभर पुराच्या पाण्यामध्ये त्या बिबट्याला पकडण्याची कवायत वन विभाग व स्वाब संस्थेच्या बचाव पथकाने केली होती. त्यानंतर आज परत सावंगी गावातील गोठ्यात घुसून गोरा ठार केल्याच्या घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रांतर्गत आलेवाही, जीवनापूर, वाढोणा,कन्हाळगाव, गोविंदपुर, येनोली, सोनुली, गिरगाव, सावंगी, ओवाळा, या भागामध्ये वाघ, बिबट यांच्या हमला मध्ये सतत पाळीव जनावरे ठार होण्याच्या घटना ह्या नित्याच्याच झाल्या असून, आता मात्र काही दिवसापासून जीवनापूर, वाढोणा, सावंगी, कन्हाळगाव या भागामध्ये गावामध्ये रात्रीला बिबट्याचे आगमन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यातच गोठ्यातून शेळ्या उचलून नेणे, कोंबड्या घेऊन जाणे ह्या घटना तळोधी वनपरिक्षेत्रात सतत घडत असतात. मात्र आता एका गोठ्यात घुसून गोऱ्याला ठार करणे यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर नियंत्रण करावे असे परिसरातील जनतेची मागणी आहे.

Previous articleगावातील अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज चितेगाव येथील शेकडो महिला पोलीस ठाण्यात धडकल्या
Next articleमूल बंद! मूल बंद!! मूल बंद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here