- मुल:-सरपंच कोमल रंधे उपसरपंच हरिदास गोहने यांचे नेतृत्वात शेकडो महिलांनी गावातील अवैध दारू बंद करण्यात यावी ही मागणी घेऊन धडक दिली.
मागील काही महिन्यापासून गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जात आहे. ही दारू मूल येथील परवानाधारक दारू दुकानातून केली जात असल्याने, गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूमुळे अनेकांनी फाशी लावून आत्महत्या केली असा आरोप यावेळी महिलांनी केला. तातडीने गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी यावेळी दिला.
ठाणेदार सुमित परतेकी यांनी या महिलांचे निवेदन स्वीकारले व अवैध दारू विक्रेत्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.