Mul :- ताडाळा गावामध्ये सत्यशोधक सप्ताह दिनांक 24 ते 30 सप्टेंबर 2024दरम्यान श्री योगेश चौधरी सर यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आलं. या सप्ताहाच्या माध्यमातून ताडाळा येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी लिहिलेलं गुलामगिरी व शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचं वाचन करण्यात आलं. व मान्यवरांच्या हस्ते बुक व पेन विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य मार्गदर्शक अॅंड प्रशांत सोनुले चंद्रपूर, डॉ. दीपक जोगदंड चंद्रपूर, श्री. विक्रम गुरूनुले मुल, श्री रोहित निकुरे गडीसुर्ला उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील कपिलदास बोरकर सदस्य ग्राम.ताडाळा, निमगडे सामाजिक कार्यकर्ता ताडाळा, ईश्वर लोनबले,विनोद कोमलवार , विनोद सोनुले , रुपेश चल्लावार , महेंद्र लोनबले ,जगदीश मोहुर्ले, भालचंद्र बोर्डावार निलेश मोहुर्ले, नरेंद्र याटेवार, रवींद्र याटेवार, नवनाथ निकुरे, जितेंद्र याटेवार ,अविनाश निकुरे, लक्ष्मण कोडापे व समस्त गावातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.