मूल :- आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 ला महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाग विदर्भ चरखा संघ मुल द्वारा संचालित खादी ग्रामोद्योग केंद्र मुल येथे खादी सप्ताहाचे उदघाटन झाले, चंद्रपूर जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळ मुल चे सहसचिव प्राचार्य ते क कापगते यांच्या हस्ते ,नप माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, उद्योजक जीवन कोंतमवार, जेष्ठ नागरिक राजाभाऊ तेलंग, पंढरीनाथ भोयर, खादी ग्रामोद्योग सचिव दादाजी बनकर, व्यवस्थापक गुरुदास बोरकर, राजू गुरनुले, मुनिष देवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले, खादी सप्ताहात 2 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत खादी च्या खरेदीवर 20% सूट देण्यात येणार आहे, खादी ग्रामोद्योग च्या वस्तू ह्या मुल येथील चरखा संघात बनल्या असल्याने स्थानिक वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वदेशीचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.