चंद्रपूर :- राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेद या योजनेची निर्मिती करण्यात आली व त्यांची अंमलबजावली करण्याची जबाबदारी उमेदच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. शासनाची ही योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या बारा वर्षापासून उमेदचे महिला कॅडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचारी अविरतपणे करीत आहेत. शासनाच्या योजनांची यशस्वीपने अंमलबजावणी करण्याची धुरा याच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.परंतु नियमित आस्थापना नसल्यामुळे उमेदच्या कर्मचाऱ्यांनाच नाउमेद होऊन उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर हा शासनाचा पराभव आहे.
एकीकडे जंगलासाठी ,जंगली जनावरांसाठी स्वतंत्र वनविभाग असून त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आस्थापना आहे पण परंतु गरिबीचे निर्मूलन करण्याच्या उद्देश्याने असलेली एवढी मोठी योजना माणसांच्या विकासासाठी असून त्यात राबणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र विस्थापना होने ही फार मोठी शोकांतिका आहे.