- Mul (kumudini bhoyar )
पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मूल शहरातील गांधी चौकातील हृदय स्थानी असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ प्रचंड घाण असायची. रस्ते उंच आणि पुतळाखाली, यामुळे पुतळ्याच्या चारही बाजूंना पाणी साचून राहायचे.
2 ऑक्टोबर गांधी जयंतीला नगर परिषदेच्या वतीने पुतळ्याला माल्यार्पण करण्याचा सोपस्कार पूर्ण केला जायचा मात्र परिसर स्वच्छतेची बोंब होती.
याच परिस्थितीवर चर्चा करताना, कलानिकेतन चे अशोक येरमे, श्रमिक एल्गारचे विजय सिद्धावार खंत व्यक्त करीत, ज्या मार्गावरून गांधीजी सावलीला गेले, अशा ऐतिहासिक आणि आणि पवित्र जागेवर, आज सर्वत्र घाण दिसत आहे. आपण येत्या दोन ऑक्टोबरला या परिसरात गांधी जयंतीचा कार्यक्रम सामुदायिक प्रार्थनेने करूया अशी संकल्पना मांडली. सामुदायिक प्रार्थना सोबतच परिसर स्वच्छता असा उपक्रम आखण्यात आला.
श्रमिक एल्गारच्या संस्थापिका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनीही या संकल्पनेला साथ दिली.
लगेच नियोजनाला सुरुवात झाली, कलानिकेतन यांनी त्यांच्या कलावंतांची रंगीत तालीम घेत गांधीजीचे प्रिय भजनाची तयारी केली.
ज्येष्ठ गांधीवादी प्राचार्य कापगते सर, प्राचार्य वसंतराव आपटे सर, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, योग परिवारातील सदस्य या सर्वांचे उपस्थितीत पाच वर्षांपूर्वी हा परिसर स्वच्छ केला, पहाटे पाच वाजेपासून रामधून, रघुपति राघव राजाराम पतित पावन सिताराम.. वैष्णव जन तो तेणे काहीए.. सारखी गांधीजींना प्रिय असलेली भजन संगीताच्या साथीने कला निकेतनच्या कलावंतांनी सादर केले. आणि दोन ऑक्टोबरला सामुदायिक प्रार्थनाचा हा कार्यक्रम नियमित सुरू आहे.
यावर्षीही दोन ऑक्टोबर 2024 ला, गांधी पुतळ्याचे परिसरात सामुदायिक प्रार्थना, व परिसर स्वच्छता कलानिकेतन मूल, प्रेस क्लब मूल, नगर परिषद मूल यांच्या वतीने घेण्यात येत आहे. गांधी प्रेमींनी या समुदाय प्रार्थनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.